उघडपणे होणार्‍या गुन्‍ह्यांसाठी भक्‍तांनी सांगितल्‍याविना कृती न करणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने अनेक खासगी प्रवासी ‘बुकिंग अ‍ॅप’ (आरक्षण करणारे अ‍ॅप) गणेशभक्‍तांची मोठ्या प्रमाणात लूटमार करत आहेत.

राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्‍या भारतभरातील ८,१११ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.९.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’ म्‍हणजे राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्‍यात्‍माविषयीची ज्ञानतृष्‍णा भागवली जाते, तसेच राष्‍ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्‍याची प्रेरणा मिळते.

असे संशोधन करतांना ते स्‍वतःच्‍या मनाने करण्‍यापेक्षा त्‍यातील जाणकारांना विचारून, तसेच त्‍यांचे मार्गदर्शन घेऊन करणे श्रेयस्‍कर !

व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या ऊर्जेशी जुळणारी श्री गणेशमूर्ती आणण्‍यापेक्षा ज्‍या मूर्तीमध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा अधिक आहे, ती निवडणे श्रेयस्‍कर !

हरितालिका व्रत

‘पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्‍त करून घेतले; म्‍हणून मनासारखा वर मिळण्‍यासाठी, तसेच अखंड सौभाग्‍य प्राप्‍त होण्‍यासाठी स्‍त्रिया हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुक्‍ल तृतीयेला करतात.

साधिकेला एकादशीच्‍या व्रताची सांगता भूवैकुंठात (रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात) करण्‍याचे लाभलेले सौभाग्‍य !

‘गुरुदेवांच्‍या कृपेमुळे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे) आम्‍हाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍य करता आले. आम्‍ही आश्रमात रहायला आल्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी मी खोलीतील कचरापेटी उघडल्‍यावर मला सुगंध येत होता.

साधकांना नामजपादी उपायांच्‍या रूपाने संजीवनी पुरवणारे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

सद़्‍गुरु गाडगीळकाका साधकांना अनिष्‍ट शक्‍तींमुळे होणारे त्रास दूर होण्‍यासाठी नामजपादी उपाय सांगतात. ते साधकांसह समाजालाही संकटकाळात उपायांविषयी मार्गदर्शन करतात. त्‍यामुळे सद़्‍गुरु गाडगीळकाका हे जणू ‘उपायगुरु’ आहेत.

स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना दिलेले प्रसादरूपी वरदान !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी व्‍यक्‍तीच्‍या जलद आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे. या अंतर्गत स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निमूर्लनाला प्रथम प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

सद़्‍गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी कर्करोगासाठी करायला सांगितलेल्‍या नामजपादी उपायांमुळे ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. वैशाली धनंजय राजहंस यांना आलेली अनुभूती

‘वर्ष २०१२ मध्‍ये मला स्‍तनाचा कर्करोग झाला होता. त्‍या वेळी सर्व वैद्यकीय उपचार करून मी त्‍यातून पूर्णपणे बरी झाले. वर्ष २०२१ मध्‍ये माझा उजवा पाय दुखू लागला. त्‍यावर सर्व वैद्यकीय उपचार, ‘फिजिओथेरपी’ आणि व्‍यायाम केले; पण पायाला आराम मिळाला नाही.

साधना चालू केल्‍यावर साधिकेमध्‍ये झालेला पालट आणि तिला आलेली अनुभूती !

‘लग्‍नाआधी मी साधना करत नव्‍हते. ‘साधना म्‍हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्‍हते. लग्‍न झाल्‍यावर आम्‍ही दोघेही (मी आणि माझे यजमान) नोकरी करत असल्‍याने घरी अल्‍प वेळ देऊ शकत होतो. त्‍यामुळे आम्‍ही साधनेला आरंभ केला नव्‍हता.