‘मुक्‍तीसंग्राम – गाथा मराठवाड्याच्‍या संघर्षाची’ चित्रपट प्रदर्शित !

मुंबई – मराठवाडा मुक्‍तीसंग्रामाची गाथा सांगणार्‍या ‘मुक्‍तीसंग्राम – गाथा मराठवाड्याच्‍या संघर्षाची’ या चित्रपटाची निर्मिती करण्‍यात आली आहे. राज्‍यशासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्‍पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले आहे. मराठवाडा मुक्‍तीदिनाच्‍या निमित्ताने मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते १६ सप्‍टेंबर या दिवशी या चित्रपटाचे लोकार्पण करण्‍यात आले.