नागपूर येथे काश्‍मीरमधून आलेल्‍या शिक्षिकेच्‍या घरी धाड !

देशविरोधी कारवायाचा संशय !

प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर – शहरातील नरेंद्रनगर येथे भाड्याच्‍या घरात रहाणार्‍या शिक्षिकेच्‍या घरावर देहली येथील केंद्रीय अन्‍वेषण विभागाच्‍या अधिकार्‍यांनी धाड घातली. काश्‍मीरमधील १ महिला काही वर्षांपूर्वी नागपूर येथे रहायला आली होती. अधिकार्‍यांनी ५ घंटे शिक्षिकेच्‍या घराची पडताळणी करून महत्त्वाची कागदपत्रे, भ्रमणभाषसंच आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) जप्‍त केले आहेत. नागपूर शहराची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लक्षात घेता शिक्षिकेवर देशविरोधी कारवायांचाही संशय व्‍यक्‍त केला जात आहे. ही महिला वर्धा रस्‍त्‍यावरील एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे.

काश्‍मीरमध्‍ये रहाणारे तिचे पती प्रतिमास नागपूर येथे येतात. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही कारवाई अत्‍यंत गुप्‍तपणे करण्‍यात आली.