नगरसुल रेल्वेस्थानकात महत्त्वाच्‍या रेल्‍वे गाड्यांना थांबा मिळावा !

भारतीय जैन संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

नगरसुल रेल्वे स्टेशन मास्‍तरांना निवेदन देतांना भारतीय जैन संघटनेचे अधिकारी

येवला (जिल्‍हा नाशिक) – नगरसुल रेल्वेस्थानकावरून  प्रवास करणार्‍यांची संख्‍या दिवसेंदिवस  वाढत आहे. येवला येथे पारंपरिक पैठणी  खरेदीसाठी अनेक पर्यटक येतात.   त्‍यामुळे येथे सचखंड एक्‍सप्रेस, नंदीग्राम एक्‍सप्रेस, राजाराणी एक्‍सप्रेस,  देवगिरी एक्‍सप्रेस, तपोवन एक्‍सप्रेस,  जनशताब्‍दी एक्‍सप्रेस  या रेल्‍वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी भारतीय जैन संघटनेच्या वतीने करण्‍यात आली आहे. हे निवेदन त्‍यांनी अन्‍न  पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्‍वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्‍य राज्यमंत्री भारती पवार  नगरसुल रेल्वे स्टेशन मास्तर गौतम आहेरे, रेल्‍वे सदस्य समीर समदडिया यांना निवेदन दिले आहे.

या वेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष रोशन भंडारी, कार्याध्यक्ष गौतम मडलेचा, उपाध्यक्ष विशाल चंडालिया, सहसेक्रेटरी अंकुश ललवाणी,  खजिनदार रवींद्र बाफना, डॉ. राजीव चंडालिया, गौतम बाफना, सचिन समदडिया,  जितेश जैन, कान्तीलाल  गादिया उपस्थित होते.