हिंदु राष्‍ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्‍यासह ६ जणांना अटक !

हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय‎ देसाई

पुणे – भूमी नावावर करून देण्‍यास नकार दिल्‍याने एका शेतकर्‍याला मारहाण केल्‍याप्रकरणी हिंदु राष्‍ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्‍यासह ६ जणांना अटक करण्‍यात आली आहे. मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून या प्रकरणी प्रदीप बलकवडे यांनी तक्रार दिली आहे. धनंजय देसाई आणि त्‍यांच्‍या साथीदारांना ९ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. या प्रकरणी धनंजय देसाई यांच्‍यासह रमेश जायभाय, श्‍याम सावंत आणि १० ते १५ साथीदारांवर गुन्‍हा नोंद केला आहे.