ठाणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

नौपाडा पोलीस ठाणे गुन्‍हा नोंदवून घेत नाही, तोपर्यंत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसले होते. काही काळ पोलिसांसमवेत चर्चा करून पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याविषयी ठाणे येथे गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

लव्‍ह जिहादसाठी ‘टेरर फंडिंग’ करणार्‍यांचा शोध घ्‍या ! – प्रसाद लाड, आमदार, भाजप

अटक केलेल्‍या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्‍यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्‍या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्‍यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे.

कुराण जाळल्यावरून आकांडतांडव करणारी इस्लामी सरकारे ही रानटी आणि ढोंगी !

इस्लामी सरकारे यांचा रानटीपणा आणि ढोंगीपणा आहे, असा घणाघात येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला.

लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशा पालटली होती ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.या पुरस्कार मिळाल्याने मी उत्साहित आणि भावूक झालो आहे.

दाभोळ खाडीतील मासे मृत : प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी केला पंचनामा !

चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली अशा ४ तालुक्यांमध्ये सामावलेल्या दाभोळ खाडीत मागील ३ दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगतांना दिसत आहेत. या संदर्भात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे संपर्क साधून याविषयी माहिती दिली.

एम्.आय.डी.सी.च्या पुढील वर्धापनदिनापर्यंत १० सहस्र कोटी रुपयांचा रत्नागिरीत प्रकल्प ! – पालकमंत्री उदय सामंत

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ सहस्र ४२२ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून, यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. एम्.आय.डी.सी.च्या पुढील वर्धापनदिनापर्यंत १० सहस्र कोटी रुपयांचा  प्रकल्प रत्नागिरीत असेल

२६ जानेवारीपर्यंत लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाचे काम पूर्ण होणार! – पालकमंत्री उदय सामंत

येथील लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम २६ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्या दिवशी हे स्मारक लोकार्पण करण्याचा मनोदय आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.

मालदीवमध्ये आतंकवादी संघटनांना साहाय्य करणार्‍या २९ आस्थापनांवर अमेरिकेने लादला प्रतिबंध !

अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ३१ जुलै या दिवशी सांगितले की, ज्या लोकांवर प्रतिबंध लादण्यात आला आहे, ते पत्रकार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आक्रमण करण्याची योजना आखत होते.

मध्यप्रदेशात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करणार्‍या अमजद खान याचे घर बुलडोझरने पाडले !

घर बेकायदेशीर असल्याने प्रशासनाने केली कारवाई !
रासुका लावण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

त्रिपुरामध्ये यावर्षी आतापर्यंत ५२ रोहिंग्या घुसखोरांना अटक

भारतात घुसखोरी केल्यानंतर अशांना अटक करून पुन्हा मायदेशात पाठवण्यासह अशा प्रकारची घुसखोरीच होणार नाही, यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !