|
डिंडोरी (मध्यप्रदेश) – येथील शाहपुरा येथे असलेल्या आई शारदा टेकडीवरील मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीचा अवमान केल्याचे नुकतेच समोर आले होते. यामागे अमजद खान आणि फिरोज खान या धर्मांध मुसलमानांचा हात असल्याचे समोर आल्याने येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दोघांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुकाच्या अंतर्गत) कारवाई करण्यासह त्यांचे घर बुलडोझरने पाडण्याची मागणी केली होती. प्रशासनाने अमजद खान याचे घर बेकायदेशीर असल्याचे सांगत बुलडोझरने पाडले आहे.
बजरंगबली की प्रतिमा का अपमान करने वाले अमजद खान के घर पर चला बुलडोजर, महाकाल की सवारी पर धमकी देने वाला शोएब शेख गिड़गिड़ाया#MadhyaPradesh https://t.co/rBR5P7CCOO
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 31, 2023
या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. खान याच्या कुटुंबियांनी शाहपुरा सोडल्याचे सांगितले जात आहे. असे असले, तरी हिंदु संघटनांचा विरोध संपलेला नाही. दुसरा आरोपी निलंबित वनरक्षक फिरोज खान याच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. फिरोजचे घर शहडोल जिल्ह्यात असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही आरोपींवर रासुकाच्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचे पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्याच्या विरोधात धर्मांध मुसलमानांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी; परंतु मुळात अशांचे घर अवैध असेल, तर ते बांधलेच कसे जाते ? त्यावर वेळीच प्रशासकीय अधिकारी कारवाई का करत नाहीत ? |