राजस्‍थान येथील १६ व्‍या राष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्‍या योगपटूंचे दैदीप्‍यमान यश !

स्‍पर्धेत योगासन करतांना सनातनचा बालसाधक कु. अर्जुन पुजारी
स्‍पर्धेत योगासन करतांना सनातनचा बालसाधक कु. अर्जुन पुजारी
‘केळकर योग वर्ग मिरज’चे योगपटू

मिरज, २३ जून (वार्ता.) – कोटा, राजस्‍थान येथे १७ आणि १८ जून या दिवशी ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या वतीने आयोजित १६ व्‍या राष्‍ट्रीय योगासन स्‍पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्‍या योगपटूंनी दैदीप्‍यमान यश मिळवले आहे. यात ७ वर्षांच्‍या आतील गटात चि. शौर्य भोसले याने प्रथम क्रमांक, कु. ईशानी देशपांडे हिने प्रथम क्रमांक, तर कु. ७ ते १३ वर्षे या वयोगटात सनातनचा बालसाधक कु. अर्जुन पुजारी याने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. या सर्व योगपटूंना डॉ. मुकुंदराव पाठक, योग शिक्षिका सौ. अंजली केळकर, श्री. मोहन जोशी, श्री. विनायक रामदुर्ग यांचे मार्गदर्शन, तसेच योगशिक्षक श्री. दीपक दुर्गाडे यांसह अन्‍यांचे मार्गदर्शन लाभले.