नागपूर – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यपदी शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न.म. जोशी यांची नावे चर्चेत होती. अखेर डॉ. शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. हे संमेलन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. लवकरच कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.