डॉ. रामोड यांच्‍या कुटुंबियांच्‍या खात्‍यात मिळाले ४७ लाख रुपये !

डॉ. अनिल रामोड

पुणे – महामार्ग लगतच्‍या भूमी प्रकरणात सकारात्‍मक निकाल देण्‍यासाठी शेतकर्‍याकडून ८ लाख रुपयांची लाच स्‍वीकारणारे अप्‍पर विभागीय आयुक्‍त डॉ. अनिल रामोड आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य यांच्‍या अधिकोशातील १७ खाती केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने पडताळली असून या खात्‍यांमध्‍ये सीबीआयला ४७ लाख रुपये मिळाले आहेत. रामोड यांच्‍या पोलीस कोठडीची मुदत संपल्‍यानंतर त्‍यांना पुन्‍हा न्‍यायालयात नेले असता विशेष न्‍यायाधीश ए.एस्. वाघमारे यांनी त्‍यांना २७ जूनपर्यंत न्‍यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने टाकलेल्‍या धाडीमध्‍ये घरातून ६ कोटी ६४ लाख रुपये आणि कार्यालयातून १ कोटी २८ लाख रुपयांची रोकड शासनाधीन केली आहे. या व्‍यतिरिक्‍त रामोड आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍यांच्‍या अधिकोषातील १७ खात्‍यांमध्‍ये ४७ लाख रुपये असल्‍याचे आढळले आहे.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांना तात्‍काळ बडतर्फच करायला हवे. या भ्रष्‍ट अधिकार्‍यांमुळेच खाबुगिरीला चालना मिळते !