ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.

कर्नाटकातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे नोंद !

देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !

धर्मांतरास नकार देणार्‍या हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून विष पाजून हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे; मात्र तरीही राज्यातील लव्ह जिहादच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता अशा घटनांसाठी फाशीची शिक्षा करण्याचीच तरतूद करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हा मूर्खपणा !’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ

हिंदु धर्माविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना त्यासंदर्भात विधाने करून स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करणारे छगन भुजबळ स्वतःचेच हसे करून घेत आहेत ! यातून कोण मूर्खपणा करत आहे ?, हे सूज्ञ जनतेला ठाऊक आहे !

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली !

ओळखपत्राविना २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देहली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश कुमार शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रह्मण्यम् प्रसाद यांच्या खंडपिठान फेटाळून लावली.

देहलीत मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृण हत्या !

राजधानीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिकांना लज्जास्पद ! देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !

अवघ्या २४ घंट्यांत इराणवर विजय मिळवू ! – तालिबानची धमकी

तालिबानी सैन्य आणि इराणचे सैन्य यांच्यात २८ मे या दिवशी पाण्यावरून सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एका तालिबान्यासह इराणचे ३ सैनिक ठार झाले.

आगरा येथील प्राचीन श्रीराम मंदिरातून चोरी झालेल्या मूर्तींचा १५ दिवसांनंतरही सुगावा नाही !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार !

भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्‍यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.

मॉरीशसमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणारा चित्रपटगृह बाँबने उडवून देण्याची धमकी !

हिंदी महासागरातील बेटांचा देश असलेल्या मॉरिशसमध्ये ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित करणार्‍या एका चित्रपटगृहला बाँबने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.