देहलीत मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृण हत्या !

  • चाकूने २० वार करून नंतर दगडाने ठेचले !

  • स्थानिक नागरिकांची बघ्याची भूमिका !

हत्यारा – साहिल

नवी देहली – येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या २० वर्षीय धर्मांध मुसलमान तरुणाने १६ वर्षांची हिंदु मुलगी साक्षी हिची प्रथम चाकूने २० वार करून आणि नंतर तिला दगडाने ठेचून ठार मारले. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाले आहे. पोलिसांनी साहिल याला बुलंदशहर येथून अटक केली आहे. घटनेच्या वेळी तेथून ये-जा करणारे अनेक जण हा प्रकार केवळ पहात होते; मात्र कुणीही पुढे येथून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, हे चित्रणातून स्पष्ट दिसून आले आहे. (समाजाची पराकोटीची असंवेदनशीलता ! असा प्रकार स्वतःच्या मुलीच्या संदर्भात घडला असता, तर लोकांनी अशीच बघ्याची भूमिका घेतली असती का ? – संपादक) साक्षी आणि साहिल यांचे प्रेमप्रकरण होते.

त्यांच्यात २८ मे या दिवशी भांडण झाल्याचे सांगितले जाते. साक्षी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावरून जात असतांना अचानक साहिल याने तिला अडवले. या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि नंतर साहिलने तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने दगडाने साक्षीला अक्षरशः ठेचले. यानंतर तो तेथून पळून गेला. साक्षीला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

(सौजन्य : News18 India) 

मनगटावर लाल दोरा बांधून ओळख लपवत होता साहिल !

देहली पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथून साहिल याला अटक केली, तेव्हा त्याच्या मनगटावर लाल दोरा बांधल्याचे आढळून आले.

मुसलमान ओळख लपवून हिंदु असल्याचे दाखवण्यासाठी त्याने हा लालदोरा बांधला होता. साहिल वातानुकूलित यंत्र दुरुस्तीचे काम करतो, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या वडिलांचे नाव सरफराज आहे.

साहिलला फाशी द्या ! – मृत मुलीच्या आईची मागणी

मृत साक्षी हिच्या आईने साहिल याला फाशी देण्याची मागणी केली आहे.

साक्षीने नुकतीच इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण केली होती. साक्षीने कधीच घरी साहिलविषयी सांगितले नव्हते.

देहली महिला आयोगाकडून पोलिसांना नोटीस !

देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी या घटनेविषयी म्हटले की, अशा मारेकर्‍यांचे मनोबल वाढले आहे.

(सौजन्य : आजतक) 

सर्व मर्यादांचे उल्लंघन झाले आहे. माझ्या आयुष्यात मी इतका भयानक प्रकार कधी पाहिलेला नाही. या घटनेवरून आम्ही पोलिसांना नोटीस बजावत आहोत.

गल्ली-बोळांत अशा किती ‘द केरल स्टोरी’ घडत रहाणार ? – भाजप नेते कपिल मिश्रा

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ट्वीट करून या घटनेवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटले की, गल्ली-बोळांत अशा किती ‘द केरल स्टोरी’ घडत रहाणार आहेत ? मुलींना कधीपर्यंत असे निर्दयतेने मारले जाणार आहे ? याच देहलीमध्ये श्रद्धा वालकर हिच्या समेवत असेच घडल होते. त्याला अद्याप फाशीची शिक्षा झालेली नाही. तो अद्यापही जिवंत आहे. जर श्रद्धाच्या मारेकर्‍याला फाशी झाली असती, तर सरफराजचा मुलगा साहिल याचे असे कृत्य करण्याचे धाडस झाले नसते.


संपादकीय भूमिका

  • राजधानी देहलीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिक यांना लज्जास्पद !
  • धर्मांध मुसलमान तरुणांनी हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी हिंदु मुलींना हिंदूंनी धर्मशिक्षण, तर सरकारने स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याला पर्याय नाही !
  • देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे ! लव्ह जिहाद्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !