राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे अज्ञानमूलक वक्तव्य !
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
नाशिक – महाराष्ट्रात अनेक मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. यावर ‘मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करणे, हा मूर्खपणा आहे’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केले. ‘मंदिरात जाणार्या शाळकरी मुलांसाठीही अशी वस्त्रसंहिता लागू करणे मूर्खपणाचे आहे’, असेही ते बरळले.
जोरदार टीका: मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे हा मूर्खपणा, पुजारी अर्धनग्न नसतात का? त्यांनीही सदरा घालावा- छगन भुजबळ#ChhaganBhujbal #TempleDressCode #NCPLeader https://t.co/tzSrGtR9kb pic.twitter.com/dY2L5WlV4X
— Divya Marathi (@MarathiDivya) May 29, 2023
नव्या संसद भवनात करण्यात आलेल्या धार्मिक विधींवरही भुजबळ यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘नव्या संसद भवनाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक विधी केले. संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. राममंदिर, शिव मंदिर येथे धार्मिक विधी केले असते, तर त्याला काहीच हरकत नव्हती; मात्र सर्व देशाचे प्रतिनिधीत्व करणार्या लोकशाहीच्या मंदिरात असे करणे चुकीचे होते.’’
(म्हणे) ‘मंदिरातील पुजारी अर्धनग्न नसतात का ?’
भुजबळ म्हणाले, ‘‘मंदिरात जे पुजारी असतात, ते अर्धनग्न नसतात का ? आतमध्ये उघडेबंब असणार्या पुजार्यांनी प्रथम सदरा घातला पाहिजे. त्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली, तरी ते पुजारी आहेत, हे ओळखता येऊ शकेल.’’
संपादकीय भूमिका : सोवळे आणि तोकडे कपडे यांतील भेदही न कळणार्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी आहे ! असे विचार म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच होय !
______________________________________
संपादकीय भूमिका
|