ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

गौहत्ती (आसाम) – ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उद्घाटन करण्यात आले. गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.