धर्मांधाला साहाय्‍य करणार्‍यांवरही ‘पॉक्‍सो’अंतर्गत गुन्‍हा नोंद करावा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

मुंबई – भांडुप येथील अल्‍पवयीन मुलीला तिच्‍याच परिसरातील एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणात त्‍याला साहाय्‍य करणार्‍यांवरही ‘पॉक्‍सो’अंतर्गत गुन्‍हा नोंद करावा, या मागणीसाठी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रात्री शिष्‍टमंडळासह पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली. (असे पोलिसांना का सांगावे लागते ? – संपादक)

‘मुलीच्‍या वडिलांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केल्‍यावर गुन्‍हेगाराला अटक झाली असली, तरी त्‍याला साहाय्‍य करणारे त्‍याचे आई-वडील आणि अन्‍य नातलग हे मोकळेच आहेत. या सर्वांवर पोक्‍सो कायद्यानुसार कारवाई करावी’, अशी मागणी लोढा यांनी निवेदनाद्वारे केली.

‘धर्मांध प्रवृत्तीच्‍या लोकांकडून महाराष्‍ट्रात अशी प्रकरणे घडवली जात आहेत. यापूर्वी वसईच्‍या श्रद्धा वालकर, तसेच चेंबूरच्‍या रूपाली चंदनशिवे यांची प्रकरणही आपल्‍यासमोर आहेत.  पुढील काळात अशा घटना टाळण्‍यासाठी पोलीस दलाने योग्‍य तो अहवाल गृह खात्‍याकडे पाठवून ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा करण्‍याचा आग्रह करावा’, अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्‍तांना या वेळी करण्‍यात आली. तसेच ‘याची कारवाई करण्‍यास दिरंगाई झाल्‍यास मुंबईतील मातृशक्‍तीला नाईलाजाने रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करावे लागेल’, अशी चेतावणीही देण्‍यात आली.