सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !
पुणे, २९ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्ट्राचा जागर करण्यासाठी येथे भव्य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.
या दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक, पू. (सौ.) संगीता पाटील, पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. धर्मध्वज पूजनानंतर श्री. विजय चौधरी, तसेच विष्णूनाद शंख पथकातील चमूने शंखनाद केला. धर्मप्रेमी, विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, संत, सद़्गुरु आणि साधक यांच्या उपस्थितीत, अत्यंत भावपूर्ण वातावरणात, जयघोषाच्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली. १२ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी, सांप्रदायिक, जिज्ञासू, वाचक, हितचिंतक, साधक यांची उपस्थिती दिंडीला लाभली.
ती पहा चालली दिंडी हिंदु एकतेची । वाट ती चाले हिंदु राष्ट्राची ।
अवघी गर्जे पुण्यनगरी । देई हिंदु राष्ट्राची ललकारी ॥
दिंडीचे झालेले स्वागत, धर्मध्वज पूजन आणि धर्मप्रेमींनी केलेली पुष्पवृष्टी !
१९ हून अधिक ठिकाणी दिंडीवर पुष्पवृष्टी झाली. सेवा मित्र मंडळाचे श्री .शिरीष मोहिते, ग्रामदैवत कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त श्रीमती संगीताताई ठकार आणि पुरोहित, गंगधर मिठाईवाले दुकानाचे मालक श्री. अभिजीत गंगाधर, निंबाळकर तालीम गणपती मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. गुलाबराव(आण्णा) गायकवाड, निंबाळकर तालीम मंडळाचे चिटणीस श्री. विशाल गायकवाड, शुभकामना एंटरप्राइजेस गंजीवाले शॉपी दुकानाचे मालक श्री. शरद गंजीवाले आणि सौ कल्पना गंजीवाले, व्होरा ट्रान्सपोर्ट कार्यालयाचे श्री. यतीन व्होरा, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय मुनोत, कीर्ती साडी सेंटरचे श्री. दिलीप गांधी, तसेच कीर्ती साळुंखे, आणि श्री अनिल साळुंखे, पूर्ण पोशाख आरिणी साडी सेंटरचे श्री नेव्हूल ग्रोगरी, नीरा येथील लॉर्ड रामा ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटचे श्री. सागर कुदळे आणि सौ. ज्योती कुदळे, भारतीय जनता पक्षाचे कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष श्री. योगेश पवार, भारतीय जनता पक्षाच्या कसबा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा सौ. सीमाताई लिमये, कलाक्षेत्रम् सिल्क आणि सारीज दुकानाचे श्री. सागर पासकंटी, वसंत बाबुराव अष्टेकर अष्टेकर ज्वेलर्स चे मालक तसेच स्थानिक शिवसेना नेते श्री. बाळासाहेब अष्टेकर, मोईगाव येथील हिरा इंजीनियरिंग, ए. एस. इंजीनियरिंग चे उद्योजक आणि गवारे परिवार, राठोड ज्वेलर्स चे सर्व कर्मचारी, हिवरे गावातील ग्रामस्थ आणि धर्मप्रेमी महिला, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा चिंतामणी प्रासादिक दिंडीचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, युआन कलेक्शनचे श्री. गिरीश धूत, कोलवडी शिवजयंती मंडळाचे सर्व शिवप्रेमी, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री. पुरुषोत्तम देवकर
दिंडीविषयीच्या प्रतिक्रिया दिंडीविषयीच्या प्रतिक्रिया दिंडीविषयीच्या प्रतिक्रिया
१. श्री. आकाश कोकाटे – हिंदु समाज अशा कार्यक्रमांमधून नक्कीच एकत्र येईल. ही दिंडी समता आणि भारतीय यांचे संघटन करण्यास उपयोगी येईल. २. एक धर्मप्रेमी – आपण आपली संस्कृती जोपासण्यासाठी एकत्र यायला हवे. हिंदूंचे भव्य संघटन व्हायला हवे.
३. एक धर्मप्रेमी – सनातन संस्था मोठे कार्य करत आहे. दिंडीमुळे पुणे शहर ढवळून निघाले असेल.
४. पूजा घाडगे – हिंदु हा एक फक्त धर्म नसून तो जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता जपून ठेवण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी एकत्रित रहाणे अनिवार्य आहे. दिंडी पाहून ‘हिंदु धर्म वाढत जाईल आणि चिरकाल टिकेल’, असा विश्वास जागृत झाला.
५. श्री. संजय – सर्वत्रचे हिंदू एकत्र यायला हवेत. सर्वांची एकजूट व्हायला हवी. सर्व हिंदूंना जोडण्याचे, त्यांना जागृत करण्याचे कार्य आवडले.
६. प्रसाद पवार – आजची दिंडी शिस्तबद्ध होती. यामुळे प्रशासनाला काहीच पहावे लागले नाही. ही आदर्श दिंडी आहे.
७. उज्ज्वला कारळे – स्वसंरक्षण प्रशिक्षण पाहून चांगले वाटले. आज मुलींनी स्वसंरक्षण शिकून घ्यायला हवे. अशी दिंडी वारंवार व्हायला हवी. टाळपथकामध्ये सर्व वयस्कर महिला उत्साहाने सहभागी झाल्या. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यायला हवा.
८. श्री. गुलाबराव (अण्णा) गायकवाड, अध्यक्ष, निंबाळकर तालीम गणपती मंदिर समिती – हिंदु संघटनाचे कार्य अतिशय चांगले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोडून ठेवले आहे. असे उपक्रम कायम व्हावेत. त्यामुळे हिंदूसंघटन वाढेल.
९. कसबा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्री. योगेश पवार – हिंदूंची जागृती होणे महत्त्वाचे असून असे कार्यक्रम वरचेवर व्हावेत. अतिशय उत्तम कार्य असून शिस्तबद्ध दिंडी आहे.
१०. सौ. सीमाताई लिमये, कसबा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा – हिंदु धर्मरक्षण करण्याची वेळ आली आहे. सक्षमपणे एकत्र येऊन हिंदु धर्माचे जतन करणे हे आपले प्रथम, तसेच राष्ट्रीय कर्तव्य आहे. हेच राष्ट्रीय हितही आहे. कोणत्याही आक्रमणाचा परिणाम आपल्यावर होऊन देता हिंदुहिताचे कार्य करण्याची सध्या आवश्यकता आहे.
११. श्री. पुरुषोत्तम देवकर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी – दिंडी अतिशय उत्कृष्ट असून नियोजनबद्ध आहे. सर्व नियमांचे पालन करून दिंडी मार्गस्थ होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरील ताण अल्प आहे.
वैशिष्ट्यपूर्ण
|
वेदमंत्रोच्चारांच्या गजरात धर्मध्वजाचे पूजन !
श्री राघवेंद्र स्वामी मठाचे मुख्य पुरोहित श्री. सुधींद्र कोर्ती आणि चंद्रकांत आचार्य यांनी धर्मध्वजाचे पूजन करून दिंडीचे स्वागत केले. मठाच्या पुरोहितांनी मंत्रपठण करून धर्माध्वजाचे पूजन केले. या वेळी प्रदीप आचार्य, अश्वक आचार्य, प्रशांत आचार्य, उदय पंडित यांच्यासह मठातील इतर सहकारी उपस्थित होते. पुरोहितांच्या वेदमंत्रोच्चारांच्या गजरात धर्मध्वजाचे पूजन झाले. या वेळी धर्मध्वजावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या मुख्य पुरोहितांनी धर्माध्वजाला मठाचे भगवे वस्त्र बांधले.
सनातन संस्थेच्या सद़्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले.
दिंडी मार्गस्थ झाल्यावर भाजपचे माजी खासदार माननीय अनिल शिरोळे यांनी प्रथम धर्मध्वजाचे पूजन केले. ‘अतिशय सुंदर उपक्रम आहे. जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे. हिंदू ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे’, असे त्यांनी म्हटले.
चतुःशृंगी देवस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्ष श्री. नंदकुमार अनगळ यांनी ‘दिंडीचे नियोजन पुष्कळ चांगले आणि शिस्तबद्ध आहे’, असे सांगितले, तसेच ‘चतुःशृंगी मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात कृती करूया’, असेही ते म्हणाले.
उपस्थित मान्यवरभाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र ट्रेडर्स कार्पोरेटर्सचे माजी अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर, प्रतापगड उत्सव समितीचे उपाध्यक्ष विनायकाका सणस, चतुःशृंगी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री. नंदकुमार अनगळ, भाजप युवा मोर्चाचे श्री. निलेश बोराटे, कसबा गणपति मंदिराच्या विश्वस्त श्रीमती संगीता ठकार, ‘सिलीऑन’ आस्थापनाचे संचालक श्री. गजानन कुलकर्णी, भोर येथील शकुंतला केबल नेटवर्कचे मालक श्री. ज्ञानेश्वर बांदल, चिंचवड येथील सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. राहुल मारणे, भाजपचे नगरसेवक राजाभाऊ कदम, डॉ. सासवडे, कोद्रे फार्मचे श्री. चेतन खळदकर, रोहित दायमे आणि इतर सहकारी, भाजपचे मोहन पानसकर आणि मनोज बलकवडे, खराडी येथील व्यापारी संघटनेचे श्री. विजय नरेला |
फेरी साकार करणारी सहभागी पथके !
मोहक बर्वे यांचे शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळाचे पथक, स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे पथक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात मावळ्यांचे वंशज श्री. राहुल मारणे आणि त्यांचे सहकारी, विष्णूनाद शंख पथक, श्री भवानी माता पालखी, टाळ पथक, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक आणि संतांच्या वेशातील बालसाधकांचे पथक, रणरागिणी पथक, पुरोहित पथक, तळेगाव येथील लेझीम पथक, सनातन टोपी परिधान केलेल्या साधकांचे पथक, क्षत्रिय पथक, मशालधारी, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांची पालखी, कलश पथक, मुलांचे ध्वज पथक, घागरी फुंकणे पथक, पिंपळखुंटे आणि उर्से येथील समाजातील ध्वज पथक, युवतींचे झांज पथक, वारकरी पथक, गायत्री परिवारातील साधकांचे पथक, कीर्तनकार पथक, जाधवर कॉलेज येथील परिचारिकांचे पथक, भोर शिरवळ येथील लेझीम पथक, गदा पथक, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, पुरुषांचे ध्वज पथक, राजगुरुनगर येथील टाळ पथक, भोर येथील फार्मसी कॉलेज पथक, गरबा पथक, प्रथमोपचार पथक, मुलींचे ध्वज पथक, ज्ञानेश्वर शाळेचे लेझीम पथक, स्वामी समर्थ मठाचे पथक हिवरे गाव महिला, ग्रामस्थ आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पथक, दांडिया पथक, पुरंदर सांस्कृतिक विभाग पथक, सासवड येथून खंडोबा पालखी सोहळ्याचे पथक, वाघाळवाडी येथून अंबाबाई मंदिराचे पथक
दिंडीच्या सांगता सभेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
हिंदु राष्ट्र अवश्य निर्माण होईल ! – रोहित भट, सरचिटणीस, काश्मिरी हिंदू सभा, पुणे
ईश्वराचे अधिष्ठान असेल, तर हिंदु राष्ट्र येणारच. भारत हे हिंदु राष्ट्र होते, आहे आणि पुढेही राहील. हिंदूसंघटनाचे असे कार्य झाल्यास एक दिवस सर्व काश्मिरी हिंदू पुन्हा काश्मीरमध्ये जाऊ.
सर्वांनी भगवंताच्या चरणी लीन होऊन कार्य करायला हवे ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज
सनातन धर्मासाठी प्राण गेला, तरी चालेल; पण हिंदु राष्ट्र निर्माण करायचे, असा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे. भगवंताच्या चरणी लीन होऊन कार्य करायला हवे.
हिंदु राष्ट्राचे साक्षीदार नाही, तर भागीदार होऊया ! – चैतन्य तागडे, सनातन संस्था
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे देशप्रेम सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी जात-पात, पंथ, संप्रदाय विसरून सर्वांनी संघटित होऊन कार्य करायला हवे. हिंदू एकतेचा आविष्कार दाखवण्यासाठी सर्वांनी संघटित व्हायला हवे. सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. सर्वांनी हिंदु राष्ट्राचे साक्षीदार नाही, तर भागीदार होऊया ! तसेच खारीचा नाही, तर सिंहाचा वाटा उचलूया !
‘हिंदु समाज अशा कार्यक्रमांमधून नक्कीच एकत्र येईल. ही दिंडी हिंदूंचे संघटन करण्यास निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल !’, असा विश्वास अनेक हिंदूंनी व्यक्त केला.
सहकार्य
१. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विमलाबाई गरवारे शाळेने त्यांचे मैदान उपलब्ध करून दिले.
२. काही धर्मप्रेमींनी सर्वांना दिंडीत सहभागी होता यावे, यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली.
३. काही धर्मप्रेमींनी दिंडीत सहभागी झालेल्या सर्वांसाठी सरबत, पाणी आणि गोळ्या यांची व्यवस्था केली.