पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्‍टाचारमुक्‍त व्‍यवस्‍था उभी केली ! – देवेंद्र फडणवीस

वर्ष २०२३ मध्‍ये नव्‍या भारताची निर्मिती झाली !

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देहली – युपीएच्‍या (संयुक्‍त पुरोगामी आघाडी) सरकारच्‍या कार्यकाळात जेवढे ऐतिहासिक घोटाळे झाले, तेवढे स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात कधीही झाले नव्‍हते. अशा प्रकारची अवस्‍था देशात पाहिली. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्‍यानंतर मागच्‍या नऊ वर्षांमध्‍ये अतिशय गतीमान निर्णयप्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला. कुठल्‍याही प्रकारे एकही डाग या सरकारवर कुणीही लावू शकले नाही. भ्रष्‍टाचारमुक्‍त व्‍यवस्‍था ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभी केली, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्‍या पत्रकार परिषदेच्‍या आधी त्‍यांनी हे वक्‍तव्‍य केले.

ते पुढे म्‍हणाले…

१. या देशात विविध योजना मोदींच्‍या नेतृत्‍वात चालू झाल्‍या, त्‍याचा अनेकांना लाभ मिळाला.

२. वर्ष २०१४ पूर्वीचा भारत वेगळा होता. वर्ष २०२३ मध्‍ये आम्‍ही नव्‍या भारताची निर्मिती पहात आहोत.