धर्मांधाला २ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा !

विदेशी महिलेच्‍या विनयभंगाचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – माझगाव दंडाधिकारी न्‍यायालयाने १९ वर्षीय आरोपी रियाझ अहमद याला दोन वर्षांचा कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा २७ मे या दिवशी सुनावली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची नागरिक असलेल्‍या महिलेचा विनयभंग केल्‍याचा रियाझवर आरोप होता.

भायखळा पोलिसांच्‍या माहितीनुसार पीडित विदेशी महिला पर्यटक काही कामानिमित्त मार्चमध्‍ये भारतात आली होती. ती रहात असलेल्‍या ठिकाणी आरोपी रियाज अहमद काम करायचा. २७ मार्च २०२३ या रात्री आरोपीने महिलेच्‍या खोलीत जाऊन तिच्‍यावर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्न केला. तिच्‍या तक्रारीवरून रियाजविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. पीडित महिला केवळ स्‍पॅनिश भाषेत संवाद साधत असल्‍याने पोलिसांना अन्‍वेषणात अडथळे येत होते. अनुवादकाच्‍या साहाय्‍याने पोलिसांनी महिलेशी संवाद साधून पुरावे गोळा केले आणि रियाजला अटक केली.

संपादकीय भूमिका :

दंडाधिकारी न्‍यायालयाने जशी २ मासांत शिक्षा सुनावली, तशीच शिक्षा अन्‍य प्रकरणांतही सुनावली गेली, तर वासनांधांना कायद्याचा धाक निर्माण होईल !