सोनसोडो येथे प्रतिदिन १५ मेट्रीक टन कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

प्रतिदिन एकूण ३५ टन ओल्या कचर्‍यापैकी प्रशासन प्रतिदिन १५ टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार, तर उरलेल्या कचऱ्याचे नियोजन कसे करणार ?

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

आजारावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी उपाय करणे आवश्यक, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासनकर्ते !

‘लहानपणापासून सात्त्विकता वाढवणारी साधना न शिकवल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडगिरी, खून इत्यादी वाढले आहेत, हेही सरकारला कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची सूची सादर करण्याचा पुणे न्यायालयाचा आदेश !

‘इंग्लंड येथील एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती सांगत राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला’, असा दावा सात्यकी सावरकर यांनी केला असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावाही प्रविष्ट केला आहे.

धार्मिक स्थळांनी ‘सीसीटीव्ही’ बसवावेत आणि सुरक्षा रक्षक नेमावेत ! – पोलीस प्रशासनाची धार्मिक स्थळांना नोटीस

मिरज शहरात एका मंदिरात तोडफोडीची घटना झाली होती, त्या पार्श्वभूमीवर नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यात प्रार्थनास्थळांच्या संदर्भात काही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त उत्तरदायी असतील, असे नमूद करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘अटल भूजल’ योजना केवळ कागदावरच ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील भूजल पातळी वाढवून पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे, हा या योजनेमागील उद्देश होता.

‘द बंगाल स्टोरी’ !

बंगाल राज्याचा दुसरा बांगलादेश होण्यापूर्वी देशभरातील हिंदू जागृत होणे आवश्यक !

श्रीरामपूर (नगर) येथे भव्य रक्तदान शिबिर !

लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ‘आगाशे सभागृहा’मध्ये सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा नदी घाटाची स्वच्छता !

घाटाची स्वच्छता ब्राह्मण पुरोहित संघाला का करावी लागते ? प्रशासन का करत नाही ?

हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

‘जोपर्यंत भारतातील प्रत्येक मंदिर हिंदूंना हे शिकवणार नाही की, सनातन म्हणजे काय ? हिंदु म्हणजे काय ? तोपर्यंत धर्मांतराच्या घटना घडत रहातील’, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले.