‘द बंगाल स्टोरी’ !

बंगालमध्ये ७०० वर्षांपूर्वी इस्लामी राजवट चालू झाली. ती आजतागायत चालू आहे, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये. मधल्या काळात जरी इंग्रजांची राजवट आली आणि आताही गेली ७५ वर्षे देशात लोकशाही असली, तरी बंगालमध्ये इस्लामचा प्रभाव ओसरलेला नाही. वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी पश्चिम भारताचा भाग पाकिस्तान म्हणून निर्माण झाला. कारण तेथे बहुसंख्य मुसलमान होते. भारतावर इस्लामी आक्रमण पश्चिमेकडूनच म्हणजे अरबी देशांतून झाले. त्यामुळे पश्चिम भागात म्हणजे अफगाणिस्तान, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि सिंध येथे हिंदूंचे प्रथम धर्मांतर झाले. पूर्व भागातही म्हणजे वंग देश असलेल्या बंगालमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले. यामुळेच फाळणीच्या वेळी पूर्व भागातील बहुसंख्य मुसलमानांमुळे तो भागही पाकिस्तानला देण्यात आला. जगाच्या इतिहासात अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये एखादा देश निर्माण होण्याची घटना घडली. फाळणीच्या वेळी येथे लक्षावधी हिंदूंचा वंशसंहार झाला आणि आजही होत आहे. वर्ष १९७१ मध्येही पाकिस्तानी सैन्याने येथील हिंदूंवर, तसेच बंगाली मुसलमानांवर अत्याचार केले. तेव्हाही लक्षावधी लोकांचा नरसंहार झाला. भारताने हस्तक्षेप करून नंतर पूर्व पाकिस्तान तोडून बांगलादेश हा देश निर्माण केला; मात्र आजही तेथे हिंदूंचा वंशसंहार चालूच आहे. भारतात राहिलेल्या बंगालमध्येही हिंदूंवर अत्याचार होतच आहेत. स्थानिक राजकीय नेते मुसलमानांच्या मतांसाठी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांना पाठीशी घालण्याची आणि हिंदूंना दडपण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत, असेच नेहमी दिसत आलेले आहे. बंगालमध्ये सत्तेवर रहाणारे काँग्रेस, माकप आणि आताची तृणमूल काँग्रेस या सर्व राजकीय पक्षांनी हेच काम केले आहे आणि करत आहेत. हिंदूंच्या धार्मिक सणांवर विविध निर्बंध घालणे आणि मुसलमानांच्या धार्मिक सणांना सुविधा पुरवणे, बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना सर्व सुविधा आणि नागरिकत्व मिळवून देणे आदी राष्ट्रविरोधी अन् धर्मविरोधी कृत्ये केली जात आहेत. बंगालमध्ये रा.स्व. संघ असो किंवा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना असोत, त्यांना त्यांचा जम बसवता आलेला नाही, त्यांना त्यांचा प्रसार करून संघटना वाढवता आलेल्या नाहीत, असेही दिसून येते. याला तेथील हिंदूंची मानसिकता, साम्यवादी विचारांचे प्राबल्य आणि धर्माभिमानाचा अभाव या गोष्टी कारणीभूत असल्याचे लक्षात येते. यामुळे १७ व्या शतकात इंग्रजांच्या विरोधात संन्याशांनी सशस्त्र स्वातंत्र्यसंग्राम केल्यानंतर २०० वर्षांत तेथील हिंदूंमध्ये धर्माभिमान दिसून आलेला नाही. विशेष म्हणजे याच बंगालला चैतन्य महाप्रभु, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची परंपरा लाभलेली असतांना आणि बंगाली हिंदू शक्तीचे उपासक असतांना त्यांच्यामध्ये धर्माविषयी आत्मघाती निष्क्रीयता निर्माण झालेली आहे. जर भविष्यात बंगालमधील हिंदू जागृत झाले नाहीत, त्यांच्यात धर्माभिमान निर्माण झाला नाही आणि ते धर्मरक्षणासाठी कृतीशील झाले नाहीत, तर बंगालचा दुसरा बांगलादेश झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. अशा वेळी ‘संपूर्ण देशातूनही त्यांच्या रक्षणासाठी कुणी धावून जाईल ?’, असे चित्र नाही. केंद्रातील सरकार आताही तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी काही विशेष करतांना दिसत नसल्याने भयाण चित्रच समोर असल्याचे दिसते.

हिंदूंचा विनाश अटळ !

धर्मांध मुसलमानांचे, जिहादी मुसलमानांचे वास्तव समोर आणणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची नवीन गोष्ट बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारकडून करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर सर्वाेच्च न्यायालयाने ही बंदी काढण्याचा आदेश दिल्यानंतरही राज्यातील पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमांतून चित्रपटगृहांच्या मालकांना धमक्या देण्यात येत असल्याने त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस केलेले नाही. सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांना लोकशाहीच्या नावाखाली अशा प्रकारे हुकूमशाही पद्धतीने चित्रपटावर बंदी घालून हिंदूंना देशात घडत असलेले सत्य दाखवण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात चित्रपटाचे निर्माते पुन्हा न्यायालयात जाऊन आवाज उठवतीलही; मात्र यातून तृणमूल काँग्रेसची राज्यघटनाद्रोही वृत्ती लक्षात येते. या अघोषित बंदीला देशभरातून विरोध होण्याची आवश्यकता आहे. एरव्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार (बंदी नव्हे) घालण्याचे हिंदूंच्या संघटनांनी आवाहन करण्यात आल्यावर एकजात पुरो(अधो)गामी या संघटनांवर तुटून पडतात; मात्र या अघोषित बंदीच्या विरोधात त्यांनी तोंड बंद ठेवलेले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने बंदी उठवतांना तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले होते, तरीही गेंड्याची कातडी असलेल्या या सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही. याविषयी अन्य राजकीय पक्ष जे नेहमीच हिंदुत्वनिष्ठ पक्षांना मुसलमानांच्या विरोधावरून धारेवर धरत असतात, ते याविषयी तृणमूल काँग्रेसला साधा प्रश्नही विचारतांना दिसत नाहीत. देशात काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत. त्यांनीही या चित्रपटावर बंदी घातलेली नाही; मात्र तृणमूल काँग्रेसने हा गुन्हा केला. बंगालमधील धर्मप्रेमी हिंदूंनी ‘आम्हाला चित्रपट पहायचा आहे’, असे सरकारला सुनावले पाहिजे आणि तो चित्रपटगृहांना संरक्षण देऊन प्रदर्शित करण्यास भाग पाडले पाहिजे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाला २ दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कुणी अशी मागणी केलेली नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही अशी मागणी केल्याचे ऐकिवात आलेले नाही. चित्रपटगृहांचे मालकही याविषयी वाच्यता करतांना दिसत नाहीत. यावरून बंगालची स्थिती हिंदूंसाठी किती भयाण आहे ? हे लक्षात येते. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बंगालमध्ये काही घडल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी बंगाललाच थेट बांगलादेश करण्याचे प्रयत्न जिहाद्यांकडून चालू आहेत आणि त्याला मतांच्या लांगूलचालनापोटी हिंदुद्रोही राजकीय पक्ष खतपाणी घालत आहेत. हे वास्तव आहे. ते रोखण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

बंगाल राज्याचा दुसरा बांगलादेश होण्यापूर्वी देशभरातील हिंदू जागृत होणे आवश्यक !