समीर वानखेडे यांच्या विरोधातील दक्षता अहवालातील दावे !
मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधातील दक्षता अहवाल आला आहे. आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणात न अडकवण्यासाठी शाहरूख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यात म्हटले आहे की, समीर वानखेडे यांनी वर्ष २०१७ ते २०२१ या काळात ६ परदेश दौरे केले आहेत. यामध्ये यूके, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. या दौर्यांसाठी समीर वानखेडे यांनी ८ लाख ७५ सहस्र रुपये खर्च दाखवला आहे. प्रत्यक्षात तो अधिक आहे. दक्षता अहवालात म्हटले आहे की,
१. लंडनच्या १९ दिवसांच्या सहलीसाठी वानखेडे यांनी एक लाखाचा खर्च दाखवला होता. ते तिथे एका नातेवाईकाकडे राहिल्याचे दाखवण्यात आले आहे.
२. वानखेडे यांनी १७ लाख ४० सहस्र रुपयांचे रोलेक्स गोल्ड घड्याळ खरेदी केले; परंतु त्याची मूळ किंमत २२ लाख ५ सहस्र आहे.
३. वानखेडे यांची मुंबईत ४ घरे आहेत. मुंबईत त्यांच्या नावे ६ मालमत्ता असून त्या वडिलोपार्जित आहेत.