बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा नाही : निपाणीत भाजपच्या शशिकला जोल्ले विजयी !

बेळगाव – मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाच्या सूत्रावर लढा देणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगाव जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना ६४ सहस्र मते मिळाली आहेत. निपाणी येथे विद्यमान मंत्री आमदार शशिकला जोल्ले या ९ सहस्र ८७६ मतांनी विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तम पाटील यांचा जोरदार प्रचार केला होता.

१. बेळगाव जिल्ह्यात १८ पैकी ११ मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपच्या प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये बेळगाव दक्षिण येथे अभय पाटील, खानापूर येथे विठ्ठल हलगेकर, तर गोकाक येथे रमेश जारकीहोळी यांचा समावेश आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये लक्षवेधी लढतीत काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर या विजयी झाल्या आहेत.

२. अथणी येथून बसवराज बोम्मई सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या लक्ष्मण सवदी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये जाऊन निवडणूक लढवत विजय मिळवला आहे.