ध्वनीप्रदूषणासंबंधी लेखी तक्रारीची वाट पाहू नका, तत्परतेने कारवाई करा ! – गोवा खंडपिठाचा पोलीस महासंचालकांना आदेश

तक्रारी करूनही कारवाई न करणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. सुव्यवस्था राखू न शकणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना जनतेने कर भरून पोसायचे कशाला ?

गोव्यात आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद

परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जगाच्या पाठीवर कुठूनही भक्तगण गोव्यातील कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ पूजा करू शकणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा अमली पदार्थ व्यवहारामध्ये सहभाग असल्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करा ! – बाल हक्क संरक्षण आयोग

शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व्यवसायात गोवले जात आहे. अशा गंभीर प्रकरणांचे अन्वेषण पोलीस स्वतःहून का करत नाहीत ? मागणी का करावी लागते ?

सिंधुदुर्गनगरी येथे देवघर धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी धरणे आंदोलन चालू

‘आधी पुनर्वसन, मग धरण (प्रकल्प), असे शासनाचे धोरण असतांना वर्षानुवर्षे प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी अर्ज, विनंत्या, आंदोलने का करावी लागतात ? याचे उत्तर सरकारने आणि लोकप्रतिनिधी यांनी जनतेला दिले पाहिजे.

इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्‍यासाठी ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे आळंदीत साखळी उपोषण !

इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्‍यासाठी, तसेच ते करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्‍यासाठी येथील संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वत मार्गावर दरड कोसळून एका भाविकाचा मृत्‍यू !

ही घटना २ मे या दिवशी ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असतांना घडली. भानुदास आरडे असे त्‍या भाविकाचे नाव आहे.

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.

पुणे शहराध्‍यक्ष प्रशांत जगताप यांच्‍यासह सर्व पदाधिकार्‍यांचे त्‍यागपत्र !

शरद पवार यांनी राष्‍ट्रवादीच्‍या अध्‍यक्षपदाचे त्‍यागपत्र दिल्‍याचे प्रकरण

कोयना धरणातून सोडले कर्नाटकला पिण्‍यासाठी पाणी !

कर्नाटक राज्‍याने पिण्‍यासाठी पाणी मागितल्‍याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्‍त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्‍यात आले.