पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनचे आक्रमण ! – रशियाचा आरोप
युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.
युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दलित वर्गासाठी केलेले कार्य कालातीत आहे, असे प्रतिपादन लेखक-प्रकाशक बाबा भांड यांनी केले. ‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वसंत व्याख्यानमालेच्या उद़्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मशिदीवरील भोंग्यामुळे होणार्या त्रासाच्या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्तांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची राज्यपाल रमेश बैस यांनी निवड केली आहे. याविषयीचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
वाळूच्या अवैध वाहतुकीस आणि तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत थेट ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू ‘अधिकृत डेपो’वरून विकण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यागपत्र देतांना वरिष्ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्वासात घ्यायला हवे होते. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्य असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
देश आर्थिक संकटात असल्याची सातत्याने ओरड करणारी काँग्रेस एवढ्या सार्या गोष्टी जनतेला विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे.
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पहाण्यासाठी जाणार्या लोकांना आळंदीतील एक रिक्शाचालक विनामूल्य रिक्शा सेवा देणार आहे. अधिकाधिक हिंदु महिलांनी हा चित्रपट पहावा आणि इस्लामी कटांविषयी जागरूक अन् सतर्क रहावे, अशी त्यांची इच्छा आहे.
तमिळनाडूमध्ये भाजपचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्पाहार देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्यात येणार्या ३ सहस्र शाळांमध्ये माध्यान्ह भोजनही चालू केले आहे.
सेनादलांच्या प्रहार क्षमतेत वाढ करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे हळूहळू येत्या १० वर्षांत पाकिस्तान त्या क्षेत्रात आपल्याशी जवळजवळ बरोबरी साधू शकेल, अशी गंभीर परिस्थिती आहे.