हानीभरपाई प्रकरणी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी न्‍यायाधीश स्‍वत: लोकन्‍यायालयात अपंग अर्जदाराकडे गेले !

रस्‍ते अपघातात मुलगा गमावलेल्‍या अपंग पालकांना हानीभरपाई देण्‍याचे प्रकरण शिवाजीनगर जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात आयोजित लोकअदालतीमध्‍ये निकाली काढले.

शिर्डी येथे शिफारशीविना ‘काऊंटर’वरून आरती पास वितरित करण्‍याचा निर्णय !

विशेष म्‍हणजे आता शिर्डीतील ग्रामस्‍थांना केवळ आधारकार्ड दाखवून दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. ग्रामस्‍थांसह अन्‍य कुणालाही सोडले जाणार नाही, असेही संस्‍थानने स्‍पष्‍ट केले आहे.

शेगाव येथील ‘आनंद सागर’ आध्‍यात्मिक केंद्र भक्‍तांसाठी खुले !

‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्‍या नकाशावर येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढले होते; पण मध्‍यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्‍थानने ‘आनंद सागर’ बंद करण्‍याचा निर्णय घेतला होता.

सुविधांअभावी त्रास होऊन वडजी येथील महिलेची रस्‍त्‍यातच प्रसूती !

वैजापूर तालुक्‍यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला ३० एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता प्रसूती कळा येत असल्‍याने लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात भरती करण्‍यात आले; मात्र वैजापूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात १२ घंट्यांनंतर साधारण प्रसूती होणार नसल्‍याचे सांगण्‍यात…

अजित पवार हे घोटाळेबाज नेते असल्‍याने त्‍यांना कधीही अटक होऊ शकते ! – शालिनीताई पाटील

राष्‍ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पुढचा अध्‍यक्ष बनवावे; कारण त्‍यासाठी त्‍या सक्षम आहेत. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्‍ह्यात अडकलेले नेते आहेत.

अजित पवार यांचा भाजपप्रवेश रोखण्‍यासाठी शरद पवार यांचे त्‍यागपत्र ! – दैनिक सामना

राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्‍या उंबरठ्यापर्यंत पोचला आहे. पक्षातील ‘ईडी’सारख्‍या अन्‍वेषण यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्‍वस्‍थता आणि त्‍यातून सहकार्‍यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण शरद पवार यांच्‍या त्‍यागपत्रात आहे काय ?

पुण्‍यात दुकानातील स्‍फोटाचे ए.टी.एस्.कडून अन्‍वेषण !

येथे १ मेच्‍या मध्‍यरात्री सातारा रस्‍त्‍यावरील सहकारनगरमधील ३ इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या दुकानांना भीषण आग लागली. यात काही इलेक्‍ट्रानिक्‍स उपकरणांचे स्‍फोट झाल्‍याने संबंधित इमारतीची पडझड झाली.

छत्रपती संभाजीनगर येथील घरकुल घोटाळ्‍यातील चुकीला क्षमा नाही, कठोर कारवाई करू ! – जी. श्रीकांत, आयुक्‍त, महापालिका

घरकुल घोटाळ्‍याविषयी सर्वप्रथम पूर्ण माहिती घेतली जाईल. मी वर्तमानपत्रात याविषयी वाचले, तेवढेच मला माहिती आहे. या प्रकरणात ज्‍यांनी चुका केल्‍या असतील, त्‍यांना क्षमा केली जाणार नाही.

खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांच्‍या अपघातात चौघे ठार !

विटा-सातारा रस्‍त्‍यावर नेवरी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांचा ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता समोरासमोर अपघात होऊन एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले आहेत.

पुणे येथे ५० सहस्र रुपयांमध्‍ये दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी उघडकीस !

५० सहस्र रुपयांमध्‍ये इयत्ता दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघड केली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सांगली येथे ही टोळी कार्यरत असून पाचवी ते सातवीच्‍या दरम्‍यान अनुतीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना कोणतीही परीक्षा न देता आयतेच दहावीचे बनावट प्रमाणपत्र देण्‍याचा हा अपप्रकार …..