१० मे या दिवशी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली.

लिस्बनच्या इस्लामिक सेंटरमध्ये आक्रमण : दोन ठार, अनेक घायाळ

हे आतंकवादी आक्रमण असल्याचा संशय आहे. आक्रमणकर्ता हा अफगाण शरणार्थी असून त्याला ३ मुले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

बनावट आणि निकृष्ट औषध निर्मितीमुळे १८ आस्थापनांची अनुज्ञप्ती रहित !

यांची अनुज्ञप्ती रहित करण्यासह निकृष्ट औषधांची निर्मिती करणार्‍यांना कारागृहात टाका  !

चीन आणि पाकिस्तानने प्रादेशिक अखंडता आणि सीमांचा आदर करावा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक येथे पार पडली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे विस्तारवादी, तसेच पाकिस्तानचे आतंकवाद्यांना खतपाणी घालण्याच्या धोरणांवर टीका केली

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ १ सहस्र हिंदूंनी काढला मोर्चा !

ब्रिस्बेन येथील हिंदूंचे अभिनंदन ! खलिस्तान्यांच्या विरोधात सर्वत्रच्या हिंदूंनी ब्रिस्बेनच्या हिंदूंचा आदर्श घ्यावा !

ग्रीसमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र आखणार्‍या दोघा पाकिस्तान्यांना अटक !

‘पाकिस्तानी भूमी ही जिहादी आतंकवादाची जननी आहे’, ही वस्तूस्थिती सत्य ठरवणारा हा आणखी एक पुरावा !

पुद्दुचेरी येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या !

पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !

देहलीतील जहांगीरपुरी या मुसलमानबहुल भागात रामनवमीच्या शोभायात्रेला पोलिसांनी नाकारली अनुमती !

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी देहली पोलिसांनी घेतला निर्णय !

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या सप्तश्रृंगी पालखीच्या दिंडीवर दगडफेक !

कायद्याचा धाक नसणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अल्पसंख्य म्हणवणार्‍या आणि बहुसंख्यांकांच्या जिवावर उठलेल्यांचा हा उद्दामपणा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?  

चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असण्याची शक्यता ! – संशोधन

‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.