बनावट आणि निकृष्ट औषध निर्मितीमुळे १८ आस्थापनांची अनुज्ञप्ती रहित !


नवी देहली –
केंद्रशासनाने बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मिती करणार्‍या १८ औषध निर्मिती करणार्‍या आस्थापनांची अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. तसेच त्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’च्या पथकांनी २० राज्यांत अचानक तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून ही तपासणी चालू आहे. या काळात हिमाचल प्रदेशातील ७०, उत्तराखंडमधील ४५ आणि मध्यप्रदेशातील २३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्‍वभूमीवर हे छापे टाकण्यात आले.

संपादकीय भूमिका

यांची अनुज्ञप्ती रहित करण्यासह निकृष्ट औषधांची निर्मिती करणार्‍यांना कारागृहात टाका  !