चीन आमचे नेते आणि अधिकारी यांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे !

मायक्रोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आरोप !

मायक्रोनेशिया देशाचे राष्ट्रपती डेविड पॅनुएलो

नवी देहली – प्रशांत महासागरातील बेट असणार्‍या मायक्रोनेशिया देशाचे राष्ट्रपती डेविड पॅनुएलो यांनी चीनवर आरोप करतांना म्हटले की, चीन प्रशांत महासागर क्षेत्रात राजनैतिक युद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. तो आमच्या देशातील नेते आणि अधिकारी यांना लाच देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच चीनमुळे माझ्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.

राष्ट्रपती डेविड पॅनुएलो यांचा कार्यकाळ येत्या २ मासांत संपणार आहे. त्यांनी देशाची संसद आणि राज्यांचे राज्यपाल यांना एक पत्र लिहून हा आरोप केला आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, चीन तैवानशी युद्ध करण्याची सिद्धता करत आहे. आमच्या देशातही हस्तक्षेप करून भविष्यात प्रशांत क्षेत्रात युद्ध करण्याचा प्रयत्नात आहे. आमच्या देशाचे अमेरिकेशी असलेले संबंध बिघडावेत, यासाठीही चीन प्रयत्न करत आहे. अमेरिका आमचा जुना मित्र आहे.