आरोग्य विभागातील १० सहस्र ५०० रिक्त पदे २ मासांत भरू ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

उजवीकडे गिरीश महाजन

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – पेपरफुटी आणि अनियमितता यांमुळे वर्ष २०१९ मध्ये घोषित करण्यात आलेली आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही. येत्या २ मासांत ही भरती आम्ही पूर्ण करू, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली. आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाविषयीची लक्षवेधी सूचना १० मार्च या दिवशी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

सौजन्य न्यूज 18 लोकमत 

आरोग्य भरतीचा ठेका ‘टिस्को’ आणि अन्य एका आस्थापनाला देण्यात आला आहे. सद्यस्थिती भरतीप्रक्रियेसाठी ‘ॲप’ सिद्ध करण्याचे काम चालू आहे. जिल्हा परिषदेमध्ये राज्यभरात १६ सहस्र जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठीही सरकार प्रयत्नरत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.