(म्हणे) ‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती !’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

काँग्रेसचे नेते मिथुन राय यांचा फुकाचा दावा !

काँग्रेसचे नेते मिथुन राय

मंगळुरू / उडुपी (कर्नाटक) – काँग्रेसचे नेते मिथुन राय यांनी राज्यातील पुथिगे गावातील नूरानी मशिदीच्या एका भवनाचे उद्घाटन करतांना, ‘उडुपीच्या श्रीकृष्ण मठाला एका मुसलमान शासकाने भूमी दान दिली होती’, असे विधान केले आहे. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यामांतून प्रसारित झाल्यावर भाजपचे आमदार रघुपती भट, तसेच पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी प्रत्युत्तर देत राय यांचे विधान खोडून काढले आहे. मिथुन राय मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्याकडून पराभूत झाले होते.

संपादकीय भूमिका

धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा नेत्यांना कारागृहात टाका !

श्रीकृष्ण मठाला राम भोज नावाच्या राजाने जागा दिली, मुसलमानाने नाही ! – पेजावर स्वामी

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी

या संदर्भात पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी म्हणाले की, श्रीकृष्ण मठाला राम भोज या राजाने भूमी दिली आहे. कोणत्याही मुसलमान शासकाने मठाला भूमी दिलेली नाही. मिथुन राय यांनी चुकीचा अर्थ लावला आहे. असे तथ्यहीन, निराधार विधान करणे योग्य नाही.

श्रीकृष्ण मठाला हिंदु राजाने भूमी दिली आहे ! – भाजपचे आमदार रघुपती भट

भाजपचे आमदार रघुपती भट

मुसलमान शासकाने श्रीकृष्ण मठाला अथवा अनंतेश्‍वर मंदिराला कोणतीही जागा दिलेली नाही. अनंतेश्‍वर मंदिराला राम भोज या राजाने जागा दिल्याचा उल्लेख आहे. याच भूमीचा उपयोग श्रीकृष्ण मठासाठी करण्यात आला आहे. अनंतेश्‍वर मंदिरानंतर श्रीकृष्ण मठाची निर्मिती झाली आहे. सध्या असलेली जामिया मशीद हीदेखील जंगमांच्या मठाच्या जागेत होती, असे सांगण्यात येते, असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार रघुपती भट यांनी मिथुन राय यांनी दिले आहे.

(म्हणे) ‘धार्मिक सौहार्दाच्या उद्देशाने केले होते विधान !’ – मिथुन राय

मिथुन राय यांच्यावर टीका होऊ लागल्याने ते म्हणाले की, मी वर्ष २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या एका दैनिकाच्या लेखाच्या आधारे विधान केले होते. (दैनिकांत प्रसिद्ध झाले, ते सर्वच सत्य असते, हे ते कशाचा आधारवर ठरवत आहेत ? एका दैनिकाने शोध पत्रकारिता करत राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स घोटाळा केल्याचा आरोप केला होता, तो काँग्रेस का मान्य करत नाही ? – संपादक)  माझा उद्देश धार्मिक सौहार्द निर्माण करण्याचा होता. या प्रकरणी मी उडुपी मठाच्या पुजार्‍याशी चर्चा केली आहे.

संपादकीय भूमिका

धार्मिक सौहार्दासाठी काशी आणि मथुरा येथील हिंदूंच्या भूमींवरील मंदिरे तोडून बांधलेल्या मशिदी आता हटवून ती भूमी हिंदूंना देण्यासाठी मुसलमान का सिद्ध होत नाहीत, हे मिथुन राय सांगतील का ? जी गोष्ट या देशात मुसलमान आक्रमकांकडून कधी झालीच नाही, ती झाल्याचे खोटे सांगून धार्मिक सौहार्द कधीही निर्माण होणार नाही !