ओडिशा येथे हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे कबुतर सापडले !

कबुतराच्या पायावर कॅमेर्‍यासारखे लावलेले उपकरण आढळले !

जगतसिंहपूर (ओडिशा) – येथील पारादीप समुद्रकिनारी मासेमारी करणार्‍या नौकेवर एका कबुतराला पकडण्यात आले. मासेमार्‍याने कबुतराला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या कबुतराच्या पंखावर मजकूर लिहिण्यात आला आहे; मात्र त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही.

कबुतराच्या पायावर कॅमेर्‍यासारखे एक उपकरण लावण्यात आले आहे. पोलिसांना संशय आहे की, या कबुतराचा वापर हेरगिरीसाठी केला जात असावा.