पणजी, ३० मार्च (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २९ मार्च या दिवशी राज्याचा २६ सहस्र ८४४ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. अर्थसंकल्पानुसार राज्याचा सर्वाधिक म्हणजे २८.४ टक्के खर्च सरकारी कर्मचार्यांचे वेतन, निवृत्तीवेतन, ग्रेच्युईटी आदींवर खर्च होत आहे, तर राज्याला सर्वाधिक म्हणजे ३७.८ टक्के महसूल राज्य सरकार आकारत असलेल्या करांतून आणि २६.६ टक्के अन्य महसूल मिळणार आहे.
रुपया कसा येणार ?१. कर्ज अथवा अन्य माध्यमांतून – १०.८ टक्के |
रुपया कसा जाणार ?१. कर्जफेड – १५.७ टक्के |
कदंब राजवटीतील राजधानी ‘चंद्रपूर’ ‘वारसा गाव’ म्हणून विकसित केल्यास गोव्याच्या इतिहासाला चालना मिळणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सासष्टी तालुक्यातील ‘चंद्रपूर’ या गावाला ‘वारसा गाव’ म्हणून विकसित करणार असल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केले आहे. चंद्रपूर ही वर्ष १३६७ पर्यंत कदंब राजवटीतील राजधानी होती.
चंद्रपूर गावात तिसर्या आणि चौथ्या शतकातील शिलालेख यापूर्वी आढळले आहेत. चंद्रपूर येथे वर्ष १९३० मध्ये केलेल्या उत्खननात नंदीची एक मोठी पाषणाची मूर्ती सापडली होती. गावात आजही त्या काळातील किल्ल्याचे अवशेष दिसत आहेत. इतिहासतज्ञांच्या मते गावातील नागरिक करत असलेले ‘मुसळ’ नृत्य हे कदंब राजवटीतील आहे.