खटाव (जिल्हा सातारा) तलाठी आणि खासगी व्यक्तीला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

सातारा, ३० मार्च (वार्ता.) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खटाव तालुक्यात सापळा रचून तलाठी आणि खासगी व्यक्तीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

खटाव येथील तक्रारदार यांना भूमीची खातेफोड करून देण्यासाठी तलाठी बर्गे यांनी २० सहस्र रुपयांची लाच मागितली. यापूर्वी तक्रारदार यांनी तलाठी बर्गे यांना १० सहस्र रुपये दिले. उर्वरित १० सहस्र देण्यापूर्वी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य अढळून आले. तलाठी बर्गे यांनी तक्रारदार यांना ५ सहस्र रुपये झेरॉक्सच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. तक्रारदारांनी रक्कम झेरॉक्सच्या दुकानात ठेवली. नंतर तलाठी बर्गे रक्कम घेण्यासाठी आल्यावर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराची बजबजपुरी नष्ट होण्यासाठी कठोर शासन करणे आणि धर्मशिक्षण देणे आवश्यक !