गोवा : कुळे ते वास्को रेल्वे दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची वाट मोकळी

या प्रकल्पाला विरोध करतांना नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते. यातील १० आक्षेप थेट फेटाळण्यात आले, तर उर्वरीत १० आक्षेप फेटाळण्यापूर्वी सुनावणी घेण्यात येऊन ‘हे आक्षेप सक्षम प्राधिकरणाच्या कक्षेत नाहीत’, असे कारण देण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत गारपीट !

जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत गारपीट झाल्याने रब्बीच्या पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरडवाडी, इस्लामपूर, कन्हेर, सरगरवाडी, मांडकी, भांब, रेडे, भांबुर्डी या भागात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे पिके आणि बागा यांची मोठी हानी झाली आहे.

पुणे येथे गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणार्‍या ९ जणांना मकोकाअंतर्गत अटक !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नाही, हे दुर्दैवी ! प्रत्येक वेळी गायींच्या हत्येप्रकरणी धर्मांध सापडतात, यातून त्यांची हिंसक वृत्ती लक्षात येते !

पुणे येथे अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवून ३०० कोटी रुपयांची फसवणूक !

अधिक चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ‘अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट’ या खासगी आस्थापनाचे सेल्वकुमार नडार यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात चोरांकडून  ४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

चोरीमध्ये साधारणतः ४ लाख ८७ सहस्र रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. कार्यक्रमाला १ लाखाहून अधिक भाविक उपस्थित होते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासन रोजंदारीवर कर्मचारी घेणार !

राज्यात ठिकठिकाणी आधुनिक वैद्य, परिचारिका, तसेच आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने रुग्ण सेवेत अडथळे येत आहेत. शस्त्रक्रिया रखडलेल्या असून रुग्णांवर उपचार करतांनाही सरकारी रुग्णालयातील व्यवस्था तोकडी पडू लागली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेत ७१ सहस्र ३१५ अर्ज प्राप्त !

२८ फेब्रुवारी ही या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती. मार्चअखेर एका वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

प्रशासकांनी (आयुक्त) अर्थसंकल्पाचा निधी किरकोळ कामांसाठी इतरत्र वळवल्याचे उघडकीस !

स्थानिक स्वरूपातील ठराविक कामांसाठी नगरसेवक अर्थसंकल्पातील तरतुदींचे वर्गीकरण करत असल्याने निधीचा विनियोग होत नाही, अशी तक्रार करणार्‍या अधिकार्‍यांनी अनेक क्षुल्लक कामांसाठी वर्गीकरण करून निधी वळवला आहे.

१ लाख रुपयांवरील थकीत पाणीदेयकाच्या रकमेवरील विलंब शुल्कात २५ टक्के सवलत !

नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीदेयकाची १ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची थकबाकी असणार्‍या ग्राहकांना लोक अदालतीमध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर ११ येथे पुलाचे बांधकाम चालू ! 

पावणे उड्डाणपूल आणि ब्ल्यू डायमंड हॉटेल ते कोपरी सेक्टर-२६ सिग्नल येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम चालू केले आहे.