पुणे येथे अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवून ३०० कोटी रुपयांची फसवणूक !

पुणे – अधिक चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ‘अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट’ या खासगी आस्थापनाचे सेल्वकुमार नडार यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन पवार यांनी तक्रार दिली होती.

आरोपी नडार आणि खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचार्‍यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी काही योजना मांडल्या होत्या. काही जणांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखवले. तक्रारदार पवार यांचा विश्वास संपादित करून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले होते. तक्रारदार यांची ३६ लाख ६५ सहस्र रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींनी पवार यांच्यासह २०० जणांकडून वेगवेगळी कारणे सांगून ३०० कोटी रुपये उकळल्याची माहिती प्राथमिक अन्वेषणातून समोर येत आहे.