पुणे येथे गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणार्‍या ९ जणांना मकोकाअंतर्गत अटक !

पिंपरी (जिल्हा पुणे) – गायींना इंजेक्शन देत बेशुद्ध करून त्यांची कत्तल करणार्‍या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई केली आहे. मोशीन कुरेशी, शाहिद कुरेशी, अब्दुल कुरेशी, आशराफ कुरेशी, आरिफ कुरेशी, सोहेल कुरेशी, राहील कुरेशी, मोशीन कुरेशी, जाफर पानीगृही अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे आयुक्तालय यांसह पुणे ग्रामीण आणि रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात रात्रीच्या वेळी गायींना गुंगीचे इंजेक्शन देत त्यांना बेशुद्ध करून त्यांची कत्तल केल्याप्रकरणी या आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ वाहने, कोयते, सत्तूर, नायलॉनच्या दोर्‍या, इंजेक्शन, औषधाची बाटली असा एकूण २५ लाख २० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून १४ गुन्हे उघडकीस आले आहेत, तसेच हत्येचा प्रयत्न, दंगल, गायीच्या चोरी, तस्करी यांसह इतर प्रकारच्या २९ गुन्ह्यांतही आरोपींचा सहभाग आहे.

संपादकीय भूमिका 

  • राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नाही, हे दुर्दैवी ! प्रत्येक वेळी गायींच्या हत्येप्रकरणी धर्मांध सापडतात, यातून त्यांची हिंसक वृत्ती लक्षात येते !
  • आमीष दाखवत मोठ्या प्रमाणात केल्या जाणार्‍या नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीला उत्तरदायी असणार्‍यांना कारागृहात डांबा !