वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर ११ येथे पुलाचे बांधकाम चालू ! 

वाहतूक कोंडी

नवी मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – पावणे उड्डाणपूल आणि ब्ल्यू डायमंड हॉटेल ते कोपरी सेक्टर-२६ सिग्नल येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम चालू केले आहे. कार्यदेशानुसार ५ कोटी ५६ लाख रुपये खर्चाचे हे काम असून सप्टेंबर २०२४ मध्ये ते पूर्ण होणार आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. या पुलामुळे वाहतूक कोंडी सुटून जनतेचा वेळ आणि इंधन यांची बचत होईल. शहरी प्रदूषणही अल्प होणार आहे.