धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात चोरांकडून  ४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी !


भाईंदर – बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमात गर्दीचा अपलाभ घेत सोनसाखळी चोरांनी महिलांचे सोन्याचे दागिने चोरले. २५ हून अधिकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या चोरीमध्ये साधारणतः ४ लाख ८७ सहस्र रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. कार्यक्रमाला १ लाखाहून अधिक भाविक उपस्थित होते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.