सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत गारपीट !

शेतीपिके आणि फळबागा यांची हानी

सोलापूर – जिल्ह्यातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत गारपीट झाल्याने रब्बीच्या पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरडवाडी, इस्लामपूर, कन्हेर, सरगरवाडी, मांडकी, भांब, रेडे, भांबुर्डी या भागात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे पिके आणि बागा यांची मोठी हानी झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर परिसरात गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे.

सौजन्य बीआर न्यूज 

लातूर – रेणापूर तालुक्यात झालेल्या गारांच्या पावसामुळे द्राक्षे, आंबा, भाजीपाला, फळबागा यांची मोठी हानी झाली आहे.