कास (जिल्‍हा सातारा) परिसरातील १५५ बांधकामे अधिकृत करण्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश !

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

सातारा – राज्‍यातील प्रसिद्ध पर्यटनस्‍थळ कास (जिल्‍हा सातारा) आणि परिसरातील येथील १५५ मिळकतधारकांनी केलेली बांधकामे अधिकृत करण्‍यात यावीत, असे आदेश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. विधानभवनामध्‍ये झालेल्‍या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्‍हाधिकारी रूचेश जयवंशी, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा-जावळी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य राजू भोसले आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

मुख्‍यमंत्री शिंदे पुढे म्‍हणाले की, एम्.एस्.आर्.डी.सी., आर्.पी. टाऊन प्‍लॅनिंग आदींच्‍या नियमांना कुठेही बाधा पोचत नाही, हे पाहूनच उपरोल्लेखित बांधकामांना अधिकृत ठरवण्‍यात आले आहे. यापुढे कास परिसरात नव्‍याने केल्‍या जाणार्‍या बांधकामांसाठी नियमावली सिद्ध करावी आणि अनुमती देण्‍यात यावी.