कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.

राज्यातील सर्व गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त होईपर्यंत संघर्ष करत रहाणार ! – महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट  

आज महाराष्ट्रातील अनेक किल्ले भुईसपाट होण्याच्या मार्गावर असून प्रशासन, पुरातत्व विभाग, वनविभाग याविषयी सुस्त असून शिवप्रेमीही उदासीन आहेत. गड-दुर्ग म्हणजे पर्यटनाची ठिकाणे नसून ती पवित्र स्थाने आहेत.

पंढरपूर मंदिरात सजावटीसाठी वापरलेली १ टन द्राक्षे गायब !  

मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्‍न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करणार !

कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या नियमितच्या कामांचीही नोंद घेणे आवश्यक असल्याची मागणी विधानसभेत उपस्थित करण्यात आली.

बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा !

या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाली असून या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी, तसेच आक्रमणास प्रवृत्त करणार्‍या या घटनांच्या मागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी.

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी मुंबईत महामोर्च्याद्वारे शासनाला आर्त साद !

छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, मागण्यांचे फलक यांसह मावळ्यांच्या वेशात महामोर्च्यात सहभागी झालेल्या गड-दुर्गप्रेमींनी गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला आर्त साद घातली !

मेघालयमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार !

मेघालयातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ३ मतदारसंघांत हिंसाचार झाल्याने काही जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे

तुटक्या एस्.टी.वर विज्ञापन दिल्याप्रकरणी निलंबित केलेल्या ‘एस्.टी’च्या कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यशासनाने विज्ञापनांऐवजी ‘एस्.टी’च्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचारी यांच्या हितासाठी पैसा वापरावा !

उत्तरप्रदेश विधानसभेने ६ पोलिसांना सुनावली १ दिवसाच्या कारावासाची शिक्षा !

उत्तरप्रदेशच्या विधानसभेत भाजपचे तत्कालीन आमदार सलील बिश्‍नोई यांनी १९ वर्षांपूर्वी आमदाराचा विशेषाधिकार भंग झाल्याच्या प्रकरणी तक्रार केली होती.

वायंगणी (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गेले एक मास या सभेचा प्रचार-प्रसार कार्य कणकवली, मालवण आणि देवगड या तालुक्यांत चालू आहे. या कार्याला समाजातील सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, त्याचा संक्षिप्त आणि चित्रमय वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.