गड-दुर्गांवर भेट देणार्‍या पर्यटकांनो, याकडे लक्ष द्या !

बहुतांश पर्यटकांचा हेतू गड-दुर्गांवर जाऊन केवळ मौजमजा करणे, छायाचित्रे काढणे इतकाच असतो. इतिहासाची ओळख करून घेणे, संबंधित गडाचे हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या काळात असलेले महत्त्व जाणून घेणे, यांविषयी त्‍यांना उत्‍सुकता नसल्यामुळे गडावर त्‍यांच्‍याकडून अपप्रकार केले जातात.

हिंदवी स्‍वराज्‍याचे शिलेदार ठरलेल्‍या गडदुर्गांची दु:स्‍थिती !

मुंबईच्‍या दक्षिण बाजूच्‍या टोकावर असलेल्‍या वांद्रेगडाची अर्ध्‍याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्‍यास गडाची सर्वच तटबंदी पडण्‍याची शक्‍यता आहे.