बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा !

बजरंग दलाची राहाता (नगर) पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !

राहाता (जिल्हा नगर) – येथील बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर काही धर्मांधांनी आक्रमण केले होते, तसेच रामपुरवाडी परिसरात दगडफेक करून त्या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे. आक्रमण करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राहाता येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहाता पोलिसांना दिले आहे.

तातडीने कारवाई न झाल्यास बजरंग दल संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणीही कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, या घटनेमुळे जातीय तेढ निर्माण झाली असून या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करावी, तसेच आक्रमणास प्रवृत्त करणार्‍या या घटनांच्या मागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी. भंडारी यांच्यावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे.

हे पण वाचा :सनातन प्रभात 

बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी यांच्‍यासह एकावर प्राणघातक आक्रमण, ९ धर्मांधांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !