वायंगणी (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मालवण – तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात शनिवार, ४ मार्च २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेले एक मास या सभेचा प्रचार-प्रसार कार्य कणकवली, मालवण आणि देवगड या तालुक्यांत चालू आहे. या कार्याला समाजातील सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असे समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी सांगितले.

या सभेच्या प्रचारार्थ विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, स्थानिक लोकप्रतिनिधी, हस्तपत्रके, होर्डिंग, वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यमे, अशा विविध स्तरांवर प्रसार करण्यात येत आहे. सभेची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचार कार्याच्या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांकडून मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. गावागावांत प्रचार करतांना राष्ट्र आणि धर्म यांवरील विविध आक्रमणे लक्षात आल्यावर अनेकांनी स्वत:हून बैठकांचे आयोजन करणे, जिज्ञासूंना सभेला येणे सोयीचे व्हावे; म्हणून वाहनांचे नियोजन करणे, वैयक्तिक स्तरावर प्रचार करणे या सेवांमध्ये सहभाग घेतला, असे श्री. मणेरीकर यांनी सांगितले.

सभेचा विषय समजल्यानंतर हिंदु राष्ट्राच्या घोषणा देतांना महिला

ख्रिस्त्यांच्या धर्मांतराला कंटाळून गोवा सोडला ! – एका वयोवृद्ध महिलेची खंत

प्रचाराच्या कालावधीत एका ८५ वर्षांच्या आजींशी भेट झाली. त्यांनी गोवा राज्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंचा कसा छळ करण्यात येत होता ? हे सांगितले. त्यांनी सांगितले की, धर्मांतरासाठी वेगवेगळी आमिषे दाखवणे, हिंदू त्याला बळी पडत नसल्यास गायीच्या रक्तात पाव बुडवून ते पाव विहिरीत टाकत असत. या छळांना कंटाळून आम्ही गोवा सोडले. आम्ही हिंदूंनी गुढीपाडव्याचा सण साजरा करू नये, यासाठी ख्रिस्ती त्रास देत असत. हा सर्व घटनाक्रम सांगतांना आजींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘मी बातम्या पहाते, त्यातील ‘लव्ह जिहाद’ विषय मला ऐकून ठाऊक आहे’, असे आजींनी या वेळी सांगितले.

या आजींना सभेचा विषय सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘सभेला येण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही झाली, तर मी रिक्शा करून सभेला येईन. हिंदूंचे संघटन होणे आवश्यक आहे.’’

– श्री. हेमंत मणेरीकर