हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद चोडणकर यांनी हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनाविरोधी कशी नाही, हिंदूंवर होणारे आघात संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, विदेशातील हिंदूंची दु:स्थिती, धर्मांतर आदी सूत्रांवर प्रकाश टाकून हिंदूंमध्ये धर्मतेज जागवले.

फोंडा येथे सार्वजनिक ठिकाणी ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थना !

फोंडा येथील फोंडा कॉमर्स सेंटरमधील लायन्स क्लबच्या सभागृहात ‘बिलिव्हर्स’च्या प्रार्थना चालू होत्या. स्थानिक अधिवक्ता वामन कुट्टीकर आणि धर्मप्रेमी यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या बंद पाडल्या.

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहेत, तर काबा मशिदीवर ॐ लिहावे !

‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहे, तर त्यांनी याला प्रमाणित करण्यासाठी त्यांच्या मशिदींवर ‘ॐ’ लिहिले पाहिजे. याचा प्रारंभ मक्केतील काबा मशिदीपासून केला पाहिजे. तेथे सोन्याच्या वर्खाचा वापर करून ॐ लिहिले पाहिजे.

निधर्मीवाद्यांच्या विरोधानंतर ‘एयरो इंडिया २०२३’मधील विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले !

एखाद्या सरकारी आस्थापनावर हिंदूंच्या देवतांविषयी आदरयुक्त भाव ठेवून कृती केल्यावर ‘धर्मनिरपेक्षते’ची आठवण होणार्‍या निधर्मीवाद्यांना सरकारी भूमींवर अतिक्रमण होऊन मशिदी बांधल्यावर ‘धर्मनिरपेक्षता’ आठवत नाही का ?

रशिया तात्काळ सोडा !

अमेरिकेने रशियात रहाणार्‍या तिच्या नागरिकांना तात्काळ रशिया सोडण्यास सांगितले आहे. ‘रशियाचे अधिकारी अमेरिकेच्या नागरिकांना विनाकारण अटक करू शकतात’, या भीतीमुळे दूतावासाने ही सूचना केली आहे.

वाहतूक पोलीस हवालदाराला १ किमी फरफटत नेणार्‍या चालकावर गुन्हा नोंद !

वाहनचालकांचा असा उद्दामपणा रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा का नाही ?चालकांवर केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी !

कन्हैयालाल यांची हत्या करण्यासाठी शेजारील मुसलमानांनी साहाय्य केले !

कन्हैयालाल यांची हत्या करण्यासाठी मुसलमान शेजार्‍यांनी माहिती गोळा करून ती खुन्यांना देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच या हत्येसाठी पाकिस्तानमधून आदेश देण्यात आला होता.

(म्हणे) ‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ –  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सीमेचे रक्षण करणार्‍या एका दलावर अशा प्रकारचा आरोप केवळ राष्ट्रघातकीच करू शकतात ! अशा आरोपातून ममता बॅनर्जी यांची मानसिकता लक्षात येते ! यासाठीच बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणे आवश्यक आहे !

 वर्ष २०१९ ते २०२१ या काळात १ लाख १२ सहस्र कामगारांनी केल्या आत्महत्या !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला ‘जीवन कसे जगायचे ?’ आणि साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील !

३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये खासगी शाळांमध्ये हिंदी शिकवली जाणार !

जम्मू-काश्मीरमध्ये ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच इयत्ता १० पर्यंत हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे. ‘जम्मू-काश्मीर स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने यासाठी ८ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.