श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच इयत्ता १० पर्यंत हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे. ‘जम्मू-काश्मीर स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने यासाठी ८ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती येत्या २० फेब्रुवारीपर्यंत काश्मीरमधील ३ सहस्रांहून अधिक खासगी शाळांमध्ये हिंदु शिकवण्याची शिफारस करणार आहे. जम्मूमध्ये हिंदी शिकवण्यात येते, तर काश्मीरमध्ये वर्ष १९९० पासून हिंदी शिकवणे बंद करण्यात आलेले आहे. त्यापूर्वी ७० टक्के खासगी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवली जात होती. आता तेथे हिंदीचे शिक्षकही उपलब्ध नाहीत.
32 साल बाद जम्मू कश्मीर में लौटी हिंदी भाषा, 3000 प्राइवेट स्कूलों में 10वीं तक होगी पढ़ाई: भड़के गुपकार गठबंधन ने कहा – यहाँ उर्दू चलता है, ये राष्ट्रीय एकता पर हमला#JammuKashmir #Hindihttps://t.co/VPK8cuoQEt
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 13, 2023
१. काश्मीरमधील भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले की, भाषा कोणत्याही धर्माशी संबंधित नसते. देशातील अन्य राज्यांतही मुसलमान विद्यार्थी हिंदी भाषा शिकतात.
२. गुपकार आघाडीचे प्रवक्ते महंमद युसुफ तारिगामी यांनी याला विरोध करतांना म्हटले की, भाजपच्या आदेशाने काश्मीरमधील खासगी शाळांमध्ये हिंदी लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याला विरोध केला जाईल. हिंदी भाषेला अन्य भाषांप्रमाणे महत्त्व देणे म्हणजे राष्ट्रीय एकतेवर आघात करण्यासारखे आहे. शैक्षणिक प्रणाली आणि प्रशासकीय संस्था यांच्यामध्ये ऊर्दू भाषेला स्वीकारण्यात आले आहे. वर्ष १९२० मध्ये महाराजा हरिसिंह यांनीच ऊर्दू अधिकृत भाषा केली आहे.