रशिया तात्काळ सोडा !

अमेरिकेची तिच्या नागरिकांना सूचना !

रशियाकडून खोट्या आरोपाखाली अटक करण्याची व्यक्त केली भीती !

मॉस्को (रशिया) – अमेरिकेने रशियात रहाणार्‍या तिच्या नागरिकांना तात्काळ रशिया सोडण्यास सांगितले आहे. ‘रशियाचे अधिकारी अमेरिकेच्या नागरिकांना विनाकारण अटक करू शकतात’, या भीतीमुळे रशियातील अमेरिकेच्या दूतावासाने ही सूचना केली आहे.

१. दूतावासाने सांगितले की, रशियाच्या अधिकार्‍यांनी खोट्या आरोपाखाली अमेरिकी  नागरिकांना अटक केली आहे. त्यांना न्याय्य चाचणी नाकारली जात आहे. खटल्याच्या वेळी कोणताही पुरावा नसतांना त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्याच वेळी रशियाच्या अधिकार्‍यांनी अनियंत्रितपणे अमेरिकी धार्मिक कार्यकर्त्यांविरुद्ध स्थानिक कायदे लागू केले आहेत आणि धार्मिक कार्यात गुंतलेल्या अमेरिकी नागरिकांविरुद्ध संशयास्पद अन्वेषण करत आहेत.

२. अमेरिकेच्या या सूचनेविषयी रशियाच्या राष्ट्रपतींचे कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, अमेरिकेचा ही सूचना काही नवीन नाही; कारण त्यांनी यापूर्वीही अनेकदा असे केले आहे.