स्वतंत्र ‘आंबा बोर्डा’साठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक प्रावधान ! – उद्योगमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकतेच महत्त्वाच्या ४ बैठका झाल्या. त्यात आंबा बागायतदारांसाठी ‘स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना’ करण्याचा पहिला ठोस निर्णय घेण्यात आला.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही ! – पालकमंत्री उदय सामंत

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले असून जो कुणी आहे, तो रिफायनरी समर्थक असूदे किंवा रिफायनरी समर्थक नसूदे, योग्य तो न्याय दिला जाईल.

गाढवाला गुळाची चव काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते मुंबईत ‘वंदे भारत’ रेल्‍वेचे लोकार्पण !

‘वंदे भारत’ च्‍या लोकार्पणानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार भुयारी मार्ग यांचेही पंतप्रधानांच्‍या हस्‍ते लोकार्पण होईल. दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान ‘अल्‍जामिया-तुस-सैफियाह’ या परिससरातील विकासकामांचे उद़्‍घाटन करणार आहेत.

पनवेल येथे १२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा !

लँड जिहाद यांसारखे हिंदूंवरील विविध आघात रोखण्‍यासह हिंदूंना पुन्‍हा एकदा सन्‍मानाने जगण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापण्‍याची आवश्‍यकता असून या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांच्‍या माध्‍यमातून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभर जनजागृती केली जात आहे.’’

सर्व समस्‍यांवर एकमेव उपाय : हिंदु राष्‍ट्र ! – सुनील घनवट,  राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

दोंडाईचा (धुळे) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा अविष्‍कार ! या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

श्रीरामपूर नगरपालिका करापोटी घेतलेल्‍या रकमेचा योग्‍य विनियोग करत नसल्‍यामुळे विश्‍व हिंदु परिषदेचे आंदोलन !

प्रशासनाच्‍या ढिसाळ कारभाराचे उदाहरण ! कर रूपाने भरलेल्‍या पैशांचा विनियोग कुठे आणि कशासाठी होतो ? हे प्रत्‍येक नागरिकांनी आता सजगपणे विचारायला हवे, तरच प्रशासनाचा कारभार सुधारेल !

अध्‍यात्‍माची महानता !

‘जेईई मेन’ परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्‍याने अध्‍यात्‍माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच !

पी.सी.एम्.सी. शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्‍यासाठी निविदा प्रसिद्ध !

‘पी.सी.एम्.सी. स्‍कूल पॅटर्न’नुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्‍यासाठी शाळांची एकसमान रचना करण्‍यात येणार आहे. त्‍या कामांची निविदा स्‍थापत्‍य विभागाने प्रसिद्ध केली आहे.

भ्रष्‍टाचार संपवणे आवश्‍यक !

भ्रष्‍टाचाराने शासकीय यंत्रणा इतकी पोखरली गेली आहे की, ‘भ्रष्‍टाचारमुक्‍त विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. ‘भ्रष्‍टाचार हाच शिष्‍टाचार झाला आहे’ आणि हे देशासाठी अत्‍यंत घातक आहे….