काश्मीर विसरून जा आणि भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणा !

सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला काश्मीर विसरून भारताशी मैत्री करून वाद संपुष्टात आणण्याचे स्पष्टपणे बजावल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ यांनी पाकमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे उघड केले आहे.

पाकिस्तानचे संरक्षण, विकास आणि समृद्धी, हे अल्लाचेच दायित्व ! – पाकचे अर्थमंत्री इशक दार

इशक दार म्हणाले की, आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे.

(म्हणे) ‘न्यायालयानेच कायदा लागू होतो कि नाही, यावर निर्णय द्यावा !’- शाम मानव, अंनिस  

पोलीस दल हा शासनाचाच एक भाग आहे आणि पोलिसांनी अभ्यासाअंती निर्णय घोषित करूनही त्याला विरोध करणे म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हिंदु धर्म आणि संत यांना लक्ष्य करणे, ही अंनिसची रीतच असल्याने शाम मानव यांच्याकडून कोणती वेगळी अपेक्षा करणार ?

अंमलबजावणी संचालनालयाकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे धाडसत्र !

आयकर विभागात होणारा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

भारत आणि चीन यांच्या सीमेवरील एकतर्फी कारवाईला आमचा विरोध ! – अमेरिका

भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही एकतर्फी कारवाई आणि घुसखोरी यांचा आमचा विरोध आहे. आम्ही याकडे बारीक लक्ष ठेवून आहोत, असे विधान अमेरिकेचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केले.

डेन्मार्कमध्येही जाळण्यात आले कुराण !

डेन्मार्कमध्ये कुराण जाळल्यानंतर तुर्कीयेने डेन्मार्कच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून समज दिली.

चीन आणि भारत अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे ! – रशिया

पाश्‍चात्त्य देश संकरीत युद्धाच्या माध्यमांतून भारत आणि चीन यांसारख्या देशांची आर्थिक शक्ती, राजकीय प्रभाव अन् त्यांचा विकास रोखू शकत नाहीत. चीन आणि भारत आधीच अनेक गोष्टींत अमेरिका अन् युरोप यांच्या पुढे आहेत, असे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केले.

जेरुसलेममध्ये प्रार्थनास्थळावरील आतंकवादी आक्रमण ८ जण ठार, तर १० जण घायाळ  

आक्रमण करणार्‍या पॅलेस्टिनी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे.

रतलाम (मध्यप्रदेश) येथे मुसलमानांकडून पुजार्‍याला घरात घुसून मारहाण !

भारतात गेली अनेक दशके मशिदींवरील भोंग्यांचा दिवसातून ५ वेळा होणारा आवाज हिंदू सहन करत आहेत, जर हिंदूंनी अशाच प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर काय झाले असते, याचा विचार कुणी करील का ?