(म्हणे) ‘न्यायालयानेच कायदा लागू होतो कि नाही, यावर निर्णय द्यावा !’- शाम मानव, अंनिस  

शाम मानव, अंनिस  

नागपूर – येथील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास नकार दिला, तसेच महाराजांच्या दिव्य दरबारात जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्ट केले होते. यावर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव म्हणाले की, या प्रकरणी आता आमच्यासमोर न्यायालयात जाण्याविना दुसरा पर्याय नाही; कारण उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाच्या निर्णयाचा हा थेट अवमान आहे.

ते म्हणाले की, आधी मी शासनाच्या समितीच्या वतीने तक्रार केलेली असल्याने आधी शासनस्तरावर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. शेवटी ‘तुम्ही आधी काय केले’, असे न्यायालय विचारू शकते. त्यामुळे हे सर्व न्यायालयाच्या समोर ठेवण्यासाठी तशी संधी मिळाली पाहिजे. शासनस्तरावर प्रयत्न करूनही प्रशासन असा निर्णय घेत असेल आणि कायदा लागू होत नाही, असे म्हणत असेल, तर मग न्यायालयानेच कायदा लागू होतो कि नाही, यावर निर्णय द्यावा.

संपादकीय भूमिका 

पोलीस दल हा शासनाचाच एक भाग आहे आणि पोलिसांनी अभ्यासाअंती निर्णय घोषित करूनही त्याला विरोध करणे म्हणजे पोलिसांवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हिंदु धर्म आणि संत यांना लक्ष्य करणे, ही अंनिसची रीतच असल्याने शाम मानव यांच्याकडून कोणती वेगळी अपेक्षा करणार ?